Pune : शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज भरण्याकरीता 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

एमपीसी न्यूज : – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (Pune)व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 18 फेब्रुवारी 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे.

या परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरण्याकरीता 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी दिली.

नियमित शुल्कासह ऑनलाईन अर्ज 15 डिसेंबरपर्यंत (Pune)भरता येणार आहेत. विलंब शुल्कासह 16 ते 23 डिसेंबर, अतिविलंब शुल्कासह 24 ते 27 डिसेंबर, अतिविशेष विलंब शुल्कासह 28 ते 31 डिसेंबरपर्यंत ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

Pune : कुरूलकर याचा जामीन अर्ज फेटाळला

31 डिसेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत आवेदनपत्रे स्वीकारले जाणार नाही. याची नोंद घेऊन शाळांनी ऑनलाईन अर्ज 15 डिसेंबर पर्यंत भरावेत असे परीक्षा परिषदेकडून सांगण्यात आले आहे

 

 

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share