Pune : हडपसर येथे मंडप सजावटीच्या साहित्याला आग

एमपीसी न्यूज- हिंगणे आळी हडपसर येथे मोकळ्या जागेमध्ये ठेवलेल्या मंडप सजावटीच्या साहित्याला आग लागून संपूर्ण साहित्य जाळून खाक झाले. ही घटना आज पहाटे साडेसहाच्या सुमारास घडली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

हडपसर अग्निशमन विभागाचे अधिकारी चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास हिंगणे आळी हडपसर येथे मोकळ्या जागेमध्ये ठेवलेल्या मंडप सजावटीच्या साहित्याला आग लागल्याची वर्दी प्राप्त झाली.

घटनेची माहिती मिळताच हडपसर आणि कोंढवा अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत २० ते २५ मिनिटात आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीत संपूर्ण साहित्य जाळून खाक झाले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. या ठिकाणी उभ्या असलेल्या वाहनांना या आगीची झळ पोहोचून काही वाहनांचे नुकसान झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.