Pune : पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे निधन

वयाच्या 77 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

एमपीसी न्यूज : पुण्याचे पहिले शीख महापौर म्हणून ओळख असलेले मोहनसिंग राजपाल यांचे आज (दि.27) रोजी निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी  त्यांनी अखेरचा(Pune) श्वास घेतला.

 

Chakan : गोविंद दुधवडे यांचे निधन

मोहनसिंग राजपाल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून 2010 पासून ते 2012  या कालावधीत  पुण्याचे महापौर झाले होते. पुण्याचे पहिले शीख महापौर अशी त्यांची वेगळी ओळख होती.ते गेले काही दिवसांपासून आजारी होते. आज दुपारी 4 वाजता जहांगीर हॉस्पिटलमध्ये(Pune) उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. उद्या (दि 28 एप्रिल) रोजी दुपारी 12 ते 4 दरम्यान रास्ता पेठ येथील त्यांच्या राहत्या घरी पार्थिव दर्शनाची वेळ ठेवण्यात आली असून उद्या संध्याकाळी वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यविधी होणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.