Pune News : सातारा राजघराण्यातील शिवाजीराजे भोसले यांचे पुण्यात निधन

एमपीसी न्यूज – साताराच्या राजघराण्यातील शांत संयमी व्यक्तिमत्व म्हणून ओळख असलेले, सातारा शहराचे माजी नगराध्यक्ष शिवाजीराजे भोसले (वय 75) यांचे मंगळवारी पुण्यात निधन झाले. पुण्यातील जहांगीर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांची प्राणजोत मालवली.शिवाजीराजे भोसले यांच्या निधनामुळे सातारकरांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

शिवाजीराजे भोसले हे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे काका होते. ते सातारा शहराचे माजी नगराध्यक्ष देखील राहिले आहेत. जेव्हा शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले यांच्यातील वाद टोकाला गेले होते त्यावेळी त्यांनी त्या दोघांमध्ये समेट घडून आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

Mumbai News : पुणे – नाशिक अतिजलद रेल्वे मार्गाला मान्यता देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची रेल्वेमंत्र्यांना विनंती

शिवाजीराजे भोसले यांना खेळाची प्रचंड आवड होती.बॅडमिंटन असोसिएशनचे ते राज्य उपाध्यक्ष राहिले होते. तसेच शिक्षण क्षेत्रातही त्यांनी भरपूर काम केले आहे.सातारा जिल्ह्यातील भैरवनाथ शिक्षण संस्थेचे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. याशिवाय शिवतेज माध्यमिक विद्यालय आरे या संस्थेच्या उल्लेखनीय कार्यात त्यांचे नेहमी मार्गदर्शन असायचे.

दरम्यान शिवाजीराजे भोसले यांच्यावर मागील काही दिवसांपासून जहांगीर रुग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्याच्या पार्थिवावर बुधवारी संगम माहुली येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.