Pune : मूकबधीर महिलेवर लष्कराच्या चार जवानांनी बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पुण्यातील खडकी परिसरात असलेल्या लष्कराच्या रुग्णालयात एका मुकबधीर महिलेवर लष्कराच्या चार जवानांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पिडीत महिलेने चौघांविरूद्ध खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार खडकी येथील लष्करी रुग्णालयात घडला

मिळालेल्या माहितीनुसार, चार वर्षापुर्वी ती रुग्णालयात रात्रपाळीत काम करत असताना एका कर्मचा-याने स्वच्छतागृहात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्याची तक्रार वरिष्ठांकडे केली असता कारवाई करण्याऐवजी त्यांनीही माझ्यावर बलात्कार केल्याचे तिने म्हटले आहे.यानंतर इतर दोघांनीही ब्लॅकमेल करत तिच्यावर बलात्कार केला.

त्यानंतर तिने इंदूर येथील एका सामाजिक संस्थेशी संपर्क साधून तेथील तज्ज्ञांच्या मदतीने पुण्यात चारही जवानां विरोधात खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.