मंगळवार, ऑक्टोबर 4, 2022

Pune : खाद्यप्रेमींना खूशखबर ! फर्ग्युसन रोडवरील ‘वैशाली’ हॉटेलची पार्सल सेवा सुरू

एमपीसी न्यूज – पुण्यातील खवय्येप्रेमींसाठी एक खूशखबर आहे. फर्ग्युसन रोडवरील ‘वैशाली हॉटेल ‘ पुन्हा सुरू झाले आहे. त्यामुळे ‘वैशाली’ च्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी आता खाद्यप्रेमींची प्रतिक्षा संपली आहे.

फर्ग्युसन रस्त्यावर वैशाली हॉटेल पुन्हा सुरू झाले आहे. पुढचे काही दिवस पार्सल सेवेच्या माध्यमातून नागरिकांना विविध पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे. सुरुवातीला बटाटा वडा, व्हेज कटलेट, साबुदाणा वडा, उत्तप्पा असे मोजकेच पदार्थ मिळणार आहेत.

सध्या हे हाॅटेल सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले ठेवण्याचा निर्णय हाॅटेल व्यवस्थापनाने घेतला आहे.

हाॅटेल सुरू झाल्याची बातमी समोर येताच नागरिकांनी हाॅटेल समोर रांग लावयला सुरुवात केली. हाॅटेल समोर खवय्यांची गर्दी झाली असली तरी सर्व जण ‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करताना दिसून आले. हाॅटेल कर्मचारी मास्क, हॅन्ड ग्लोज व सॅनिटायझर यांचा सुद्धा वापर करत आहेत.

तीनही लाॅकडाऊन दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हाॅटेल बंदच ठेवण्यात आले होते. मात्र, सरकारने पार्सल सेवेला परवानगी दिल्यानंतर व्यवस्थापनाने हाॅटेल सुरू करण्याचा निर्णय घेतला.

‘वैशाली’ च्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन हाॅटेल व्यवस्थापनाने केले आहे.

 

spot_img
Latest news
Related news