Pune : प्रत्यक्ष मुख्य सभा घेण्यासाठी शासनाची परवानगी नाही : महापौर

ऑगस्ट महिन्यात प्रत्यक्ष सभा घेऊ द्यावी, अशी मागणी दोन वेळा राज्य शासनाकडे पत्राद्वारे करण्यात आली. मात्र, शासनाने याबाबत कोणतेहीआदेश दिले नाहीत. : Govt not allowed to hold actual main meeting: Mayor

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाचे अभूतपूर्व असे संकट निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट महिन्यात प्रत्यक्ष सभा घेऊ द्यावी, अशी मागणी दोन वेळा राज्य शासनाकडे पत्राद्वारे करण्यात आली. मात्र, शासनाने याबाबत कोणतेहीआदेश दिले नाहीत. तुमच्याप्रमाणे आम्हालाही कोरोनाचे गांभीर्य आहे, अशा शब्दांत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विरोधकांना सुनावले.

बुधवारी (दि. 5 ऑगस्ट) दुपारी 3 वाजता महापालिकेची मुख्य सभा ऑनलाइन आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मनसे, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेसच्या नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली. तब्बल 20 मिनिटे सभेचे कामकाज थांबले होते.

जुलै महिन्याच्या सर्वसाधारण सभेत आपण ऑगस्ट महिन्यात प्रत्यक्षात सभा घेणार असल्याचे सांगितले होते. मात्र, 31 ऑगस्टपर्यंत आहे तीच परिस्थिती कायम राहणार असल्याचे राज्य शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे मनपा, स्थानिक स्वराज्य संस्था, विषय समित्याच्या बैठका ऑनलाइनच घेण्यास सांगण्यात आले आहे.

ऑनलाइन सभा घेतल्यास कामकाज होत नाही. 155 नगरसेवक घरांत बसून आहेत. केवळ 10 नगरसेवक येथे सभागृहात उपस्थित आहेत.

राज्य शासनाला दोन वेळा पत्र पाठविले. पण, उत्तर आले नाही. राज्य शासन राज्याचा निर्णय घेणार आहे, असेही महापौरांनी सांगितले.

मग स्थायी समितीची बैठक कशी घेता, असा सवाल विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी उपस्थित केला. त्यावर मंत्रिमंडळची बैठक होते, तशी स्थायी समिती बैठक होते.

ऑनलाइन सभेत 150 सभासद आपापल्या घरून सहभागी होतात. त्यांना बोलू दिले नाही तर त्यांच्यावर अन्याय होणार नाही का, असा संतप्त सवालही महापौरांनी उपस्थित केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.