Pune : आंतरराष्ट्रीय भारतीय नृत्य महोत्सवात बहारदार सादरीकरण

चार ज्येष्ठ नृत्य गुरूंचा सत्कार

एमपीसी न्यूज- आंतरराष्ट्रीय भारतीय नृत्य महोत्सवाचे संचालक शामहरी चक्रा व ‘संस्कृतीकी’ संस्था यांच्या सहयोगाने भारतीय विद्या भवन – इन्फोसिस फाऊंडेशन आयोजित सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमाअंतर्गत आंतरराष्ट्रीय भारतीय नृत्य महोत्सवाचे उद्घाटन २६ जानेवारी सकाळी रोजी करण्यात आले .

महोत्सवाचा शुभारंभ ज्येष्ठ नृत्यांगना गुरु मनीषा साठे, शमा भाटे, सुचेता भिडे -चापेकर, रोशन दात्ये यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. श्यामहरी चक्रा दुपारच्या सत्रात सहभागी झाले.

ज्येष्ठ नृत्यांगना गुरु मनीषा साठे, शमा भाटे, सुचेता भिडे – चापेकर, रोशन दात्ये यांचा प्रा. नंदकुमार काकिर्डे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक केले. महोत्सव संयोजक रसिका गुमास्ते यांनी सूत्रसंचालन केले.

भरत नाट्यम, कथ्थक, ओडिसी,मणिपुरी, कुचीपुडी, मोहिनी अट्टम , लावणी, फ्लेमेंको, सत्तरिया, छाऊ, कथ्थक, मोहिनी अट्टम इ. नृत्यप्रकार दोन दिवसात सादर केले गेले. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात चेन्नई, बंगलोर, भुवनेश्वर, मुंबई येथील अनुसुया राव, अमरनाथ घोष, प्रियांका भिडे आदी कलाकारांनी कला सादर केली.हा महोत्सव सर्वांसाठी खुला हाेता.

शनिवारी दुपारच्या सत्रात प्रियांका भिडे ( मुंबई ) यांनी कथक नृत्य सादर केले. रुचिरा इंगळे आणि सहकाऱ्यांनी लोककला नृत्य सादर केले. गौरी गाडगीळ यांच्या समवेत शिल्प नृत्यालय ट्रस्टच्या विशेष दिव्यांग कलाकारांनी कथक तसेच अनेक नृत्यप्रकार सादर करून वाहवा मिळवली.

रविवारच्या सत्रात मयुरी हरिदास ( पुणे ) यांचे कथक, अक्षय श्रीनिवासन ( मुंबई ), अबोली धायरकर ( पुणे ) यांचे कथक, उन्नती अजमेरा ( मुंबई ) यांचे मोहिनी अट्टम, पूजा काळे यांचे ओडिसी, मिनाझ खान यांचे कथक, सुष्मिता बिस्वाई ( भुवनेश्वर ) यांचे ओडिसी नृत्य सादरीकरण आयोजित करण्यात आले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.