Pune: कोंढवा पोलिसांची सतर्कता, अल्पवयीन मुलीची सुखरुप सुटका

Pune: Kondhwa police vigilance, safe release of minor girl आरोपीने या मुलीला ब्युटी पार्लर टाकून देण्याचे आमिष दाखवून पळवून नेले होते. मुलीने घरातून पळून जाताना आईचे सोन्याचांदीचे दागिने नेले होते.

एमपीसी न्यूज- ब्युटी पार्लर टाकण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या एका तरुणाला कोंढवा पोलिसांनी अटक केली असून मुलीची त्याच्या तावडीतून सुटका केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी विनोद राजू सोनवणे (वय 29) या तरुणाला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका 45 वर्षीय महिलेने अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याप्रकरणी तक्रार दिली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना पीडित मुलगी कोंढवा परिसरात समता नगर येथे एका तरुणासोबत थांबली असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून पीडित मुलीची सुखरूप सुटका केली.

पोलिसांनी केलेल्या अधिक चौकशीत आरोपीने या मुलीला ब्युटी पार्लर टाकून देण्याचे आमिष दाखवून पळवून नेले होते. मुलीने घरातून पळून जाताना आईचे सोन्याचांदीचे दागिने नेले होते.

आरोपीने हे दागिने एकच सोनाराकडे तारण ठेवले होते. त्यातून मिळालेल्या पैशातून ते उदरनिर्वाह चालवत होते. पोलिसांनी सोनाराकडून हे दागिने परत घेऊन फिर्यादी महिलेला परत दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.