Pune : लिंगायत समाजाचे नेते राजकुमार भोगशेट्टी यांचे निधन

एमपीसी न्यूज – लिंगायत समाजाचे नेते राजकुमार सूर्यकांत भोगशेट्टी यांचे मंगळवारी (दि. 4) सकाळी 10 वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते वय 62 वर्षाचे होते. त्यांच्या मागे आई, पत्नी, दोन मुले, दोन विवाहित भाऊ व एक विवाहित बहीण असा परिवार आहे.

राजकुमार सूर्यकांत भोगशेट्टी हे पुण्यातील भारत पेट्रोलीयम गॅस कंपनीचे वितरक व विश्वनाथ गॅस एजन्सीचे मालक होते. त्यांचा सामाजिक आणि धार्मिक कार्यात नेहमी सहभाग असायचा.

पुण्यातील लिंगायत समाज व इतर समाजिक कार्यात भरीव काम केले आहे. तसेच सोलापूर येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर देवस्थानचे ते काही काळ विश्वस्त होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.