Pune: वाढता वाढता वाढे… कोरोनाचे रुग्ण! भवानी पेठ, कसबा, ढोले पाटील रोड परिसरात जास्त रुग्ण

एमपीसी न्यूज – युद्धपातळीवर उपाययोजना करूनही पुण्यातील कोरोनाचे रुग्ण काही कमी होत नाही. उलट या रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढच होत आहे. भवानी पेठ, कसबा, ढोले पाटील रोड परिसरात जास्त रुग्ण आढळून येत आहेत.

सर्वाधिक दाटीवाटीने असलेल्या परिसरात भवानी पेठेत कोरोनाचे 168, कसबा – विश्रामबागवाडा 102, ढोले पाटील रोड 97, येरवडा 68, धनकवडी – सहकारनगर 38, वानवडी – रामटेकडी 32, बिबवेवाडी 24, असे 7 प्रभागांत जवळपास 550 कोरोनाचे रुग्ण आहेत. पुण्यातील कोरोनाचा आकडा 700 च्या पुढे गेला आहे. भवानी पेठेत 15 जणांचा,  कसबा – विश्रामबागवाडा 6, वानवडी – रामटेकडी 6, हडपसर – मुंढवा 5, शिवजीनागर – घुलेरोड 4, ढोले पाटील रोड 3, येरवडा – कळस – धानोरी 3, बिबवेवाडी 2, धनकवडी – सहकारनगर 2, वारजे – कर्वेनगर 1, कोंढवा – येवलेवाडी 1, पुण्याबाहेरील 2, आशा 51 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे, अशी माहिती पुणे महापालिकेतर्फे देण्यात आली.

कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने संपूर्ण पुणे शहर महापालिकेतर्फे सील करण्यात आले आहे. पोलिसांनी याची कडकपणे अंमलबजावणी सुरू केली आहे. पुणे शहरातील मध्यवर्ती भागांत आणखी कडक निर्बंध लादण्यात आले आहे. आता नागरिकांना बाहेर निघणे कठीण होणार आहे. किराणा, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंनाही बंदी घातली आहे. दूध आणि मेडिकल दुकानेच सुरू राहणार आहेत. लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करून कोरोनाला आटोक्यात आणण्याचा या मागचा उद्देश आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.