Pune : हवामान खात्याचे संकेत; रविवारी पारा 41 अंशाचा टप्पा ओलांडण्याची शक्यता

एमपीसी न्यूज : येत्या काही दिवसांत पुण्यात कमालीचे (Pune) तापमान वाढण्याची शक्यता आहे. रविवारी म्हणजे उद्या पारा 41अंशाचा टप्पा ओलांडण्याची शक्यता असल्याचे संकेत भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) दिले आहेत. 

हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला नसला तरी, लोकांना उष्माघातापासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.  लोकांना शक्य तितके हायड्रेटेड राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेदरम्यान बाहेर जाणे टाळावे, अशा सूचनाही दिल्या आहेत.

Pune : रसिकांनी सायंकाळी अनुभवले रात्रसमयीचे ‘कानडा के प्रकार’

आज शिरूर जिल्ह्यात 42 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मगरपट्टा, लवळे, कोरेगाव या सर्व ठिकाणी 40 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. लोणावळा जिल्ह्यात 34.5 कमाल तापमानाची नोंद झाली असून इतर सर्व भागांमध्ये 35 ते 40 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे.

दरम्यान, नैऋत्य मोसमी पावसाने शुक्रवारी निकोबार बेटाला स्पर्श (Pune) केल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे. 4 जून ही केरळच्या किनार्‍यावर मान्सून सुरू होण्याची संभाव्य तारीख आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.