Pune : पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये संग्राम थोपटे यांच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड

एमपीसी न्यूज – पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये आमदार संग्राम थोपटे कार्यकर्त्यांकडून जबरदस्त तोडफोडीचा आज प्रकार घडला. पुण्यात भोर, वेल्हा आणि मुळशीच्या आमदार संग्राम थोपटे समर्थकांनी राडा केल्याचे प्राथमिक वृत्त आहे.

याबाबत सूत्रांकडून मिळालेली प्राथमिक माहिती अशी कि, मंत्रीमंडळात आमदार संग्राम थोपटे यांना स्थान न दिल्याने पुण्यात शिवाजीनगर येथील काँग्रेस भवनची आमदार संग्राम थोपटे कार्यकर्त्यांकडून तोडफोड केली आहे. आमदार संग्राम थोपटे यांना मंत्रीमंडळात सहभाग करून घेतले नसल्याने कार्यकर्ते नाराज होते. पुणे शहर आणि जिल्हा कार्यलय शिवाजीनगर येथे एकाच इमारतीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.