PUNE : ‘फोन करायचाय’ असे सांगून ते पळवायचे मोबाईल; पोलिसांनी चोरट्यांना ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज – फोन करण्यासाठी रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना मोबाईल फोन मागून तो मोबाईल चोरून नेणाऱ्या दोघांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

सोहेल शकील काझी (वय 21) आणि सूरज शशिकांत चव्हाण (वय 21, दोघेही रा. शिरूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, काही दिवसांपूर्वी फिर्यादी अमर बालाजी लगड हे रांजणगाव एमआयडीसीत कामासाठी पायी निघाले होते. त्याचवेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी मोबाईल फोन करायचा आहे, असे सांगून त्यांचा फोन चोरून नेला होता. याप्रकरणी रांजणगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्हे शाखेच्या पोलिसांना वरील आरोपींची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्यांना शिरूर येथून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी मोबाईल चोरल्याची कबुली दिली. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.