Pune News: विद्यार्थ्यांनो अभ्यासाची आवड निर्माण करा – प्रा.डाॅ.गजानन एकबोटे

एमपीसी न्यूज : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न हायस्कूल पुणे 5 च्या एक हजार विद्यार्थ्यांना ऊन,वारा,पर्जन्य यापासून संरक्षण मिळावे म्हणून छत्र्याचं वाटप करण्यात आल्या. (Pune News)आपणास मिळालेल्या शिक्षणरूपी छत्रीचा वापर जीवनामध्ये अनेक ठिकाणी करा असा मोलाचा सल्ला कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

 

 

प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीची व मॉडर्न हायस्कूलची दैदीप्यमान परंपरा असून या संस्थेने व प्रशालेने अनेक नामवंत विद्यार्थी घडविले आहेत. तुम्ही मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत आहात त्यामुळे तुम्ही खूप नशीबवान आहात असं डॉ. एकबोटे यांनी सांगितल. पालकांशी हितगुज करताना ते म्हणाले पालकांनी मुलांना वेळ द्यावा व मुलांच्या शिक्षणात पैसे गुंतवा त्यांना चांगले शिक्षण द्या. (Pune News) शिक्षण हे कवच कुंडल आहे.

 

 

शिक्षण भावी जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनो शाळेचे उपकार फार मोठे असतात. ते कधी विसरू नये. यावेळी त्यांनी डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम व भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांची उदाहरणे देऊन विद्यार्थ्यात नवचैतन्य निर्माण केले. विद्यार्थ्यांनो अभ्यासाची आवड निर्माण करण्यासाठी आत्मविश्वास वाढवावा लागेल. यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. आपणास मिळालेल्या शिक्षणरूपी छत्रीचा वापर जीवनामध्ये अनेक ठिकाणी करा.

 

 

 

 

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका रोहिणी काळे, सूत्रसंचालन सुमिता पाटील, आभार उपमुख्याध्यापिका वंदना सोनोने यांनी केले. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे, संस्थेचे कार्यवाह श्यामकांत देशमुख, कार्यक्षम नगरसेविका व उपकार्यवाहक ज्योत्स्ना एकबोटे, शाळा समिती अध्यक्ष चित्तरंजन कांबळे, नियामक मंडळ सदस्या डॉ.निवेदिता एकबोटे, मृगजा कुलकर्णी,प्रमोद शिंदे,पल्लवी जाधव, सिनेट मेंबर दादाभाऊ शिनलकर,मुख्याध्यापिका रोहिणी काळे,उपमुख्याध्यापिका वंदना सोनोने,पर्यवेक्षक निवृत्ती गोपाळे, प्राचार्य राजेंद्र झुंजारराव उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.