Uddhav Thackeray : बंडखोरांना शिवसेनेचे निवडणूक चिन्ह वापरू देणार नाही

एमपीसी न्यूज : आज माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेतली. परिषदेच्या सुरुवातीलाच त्यांनी पत्रकारांचे येण्याबद्दल आभार मानले. एकनाथ शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या पहिल्या जाहीर भाषणात, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यात नव्याने निवडणुका घेण्याची मागणी केली आणि बंडखोरांना शिवसेनेचे निवडणूक चिन्ह वापरू देणार नाही, असे सांगितले.

पुढे ते म्हणाले, कि ”वारकऱ्यांची इच्छा आहे, कि मी पंढरपूरला यावे. मी पंढरपूरला येणार नक्की. पण या गदारोळात मी येणार नाही. पंढरपूरला येऊन विठ्ठल माऊलीचे दर्शन नक्की घेईन.”

धनुष्यबाण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही –

ठाकरे म्हणले, की ”कायद्याच्या दृष्टीने पाहिले, तर धनुष्यबाण शिवसैनिकांपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. त्याबाबतची चिंता सोडा. याबाबत बोलताना मी म्हंटले होते, कि निवडणुकीला चिन्ह महत्त्वाचे असतेच. पण, हा धनुष्यबाण कोणाच्या हातात आहे? हे देखील लोक बघतात. म्हणजे काय आपण म्हणतो कि याची चिन्ह काही बरोबर नाहीत. तर मी हे केवळ उदाहरण दिले होते. याचा अर्थ असा नाही, कि मी चिन्ह बदला असे म्हंटले आहे. त्यामुळे मी ठामपणे सांगतो, कि शिवसेनेपासून कोणीही धनुष्यबाण हिरावून घेऊ शकत नाही.”

Shinzo Abe Dies : भारताने जवळचा मित्र गमावला – पंतप्रधान नरेंद्र मोदी

तर लोक आम्हाला घरी पाठवतील – 

आज विधानसभेच्या निवडणुका घ्याव्यात असे मी त्यांना आव्हान देतो. आमची चूक झाली असेल, तर लोक आम्हाला घरी पाठवतील. आणि हेच जर तुम्हाला करायचे होते, तर तुम्ही अडीच वर्षांपूर्वी करायला हवे होते. ते आदरपूर्वक झाले असते. हे सर्व करण्याची गरज नाही, असे ठाकरे म्हणाले.

आमच्या प्रतिष्ठेवर हल्ले केले – Uddhav Thackeray

गेल्या अडीच वर्षात भाजपने त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला टार्गेट केले आणि शिवीगाळ केली तेव्हा गप्प बसल्याबद्दल ठाकरे यांनी शिवसेनेच्या बंडखोर गटाला फटकारले. ते म्हणाले, कि “काही लोक म्हणतात त्यांना मातोश्रीवर बोलावले तर ते येतील. ते म्हणतात माझ्याबद्दल आदर आहे. मी आभारी आहे. पण तुम्ही येऊन माझ्याशी बोलले असते तर तुम्हाला या दौऱ्यावर जाण्याची गरजच पडली नसती. पण आता तुम्ही अशा लोकांसोबत आहात, ज्यांनी माझ्या कुटुंबावर अश्लाघ्य भाषेत टीका केली. त्यांनी आमच्या प्रतिष्ठेवर हल्ले केले आहेत. त्यामुळे तुमचे प्रेम आणि आदर खरा आहे का ते तुम्हीच ठरवा,”

देशाची दिशा दाखवणारा निकाल

“धमक्या देऊनही माझ्यासोबत असलेल्या 15-16 आमदारांचा मला अभिमान आहे. हा देश सत्यमेव भयतेवर नव्हे तर सत्यमेव जयतेवर भरभराटीला येतो. सर्वोच्च न्यायालयाचा सोमवारचा निर्णय शिवसेनेच्या भवितव्याचाच नाही तर भारतीय लोकशाहीच्या भवितव्याचाही निर्णय घेईल. 11 जुलैच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष आहे. निकाल काय लागेल याची मला चिंता नाही. माझा न्यायदेवतेवर विश्वास आहे. उद्या जो निकाल लागेल तो शिवसेनेचे भवितव्य ठरवणार नाही. कारण शिवसैनिक त्यासाठी मजबूत आहे. शिवसेनेचे कोणी काही वाकडे करू शकत नाही. पण, उद्या लागणारा निकाल हा देशाची दिशा दाखवणारा (Uddhav Thackeray) निकाल ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.