Pune : रस्त्यावर थुंकणाऱ्या विरोधात महापालिकेची धडक कारवाई!

एमपीसी न्यूज – ‘कोरोना’चा पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहे. रस्त्यावर थुंकणाऱ्या विरोधात महापालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. आणि दंड म्हणून त्यांच्याकडून दिनांक 19 मार्च 2020 अखेर 5 लाख 82 हजार 284 रुपये दंड वसूल करण्यात आला. दिनांक 1 नोव्हेंबर 2018 पासून ही कारवाई सुरूच आहे.

वारजे – कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय नळस्टॉप चौक, भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येणाऱ्या रस्त्यांवर थुंकणार्या विरोधात महापालिकेने कडक कारवाई केली. आरोग्य निरीक्षक सावंत, जाधव यांनी ही कारवाई केली.

सार्वजनिक ठिकाणी रस्त्यांवर कचरा टाकणाऱ्यांकडून 1 कोटी 80 लाख 8 हजार 216 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी घाण करणाऱ्यांकडून 8 लाख दंड वसूल करण्यात आला आहे. तर, पुणे शहरात कोरोनाचा प्रसार मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. रस्त्यांवर थुंकू नये, इतरांनाही थुंकण्यापासून परावृत्त करा, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ, नगरसेवक जयंत भावे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.