Pune: भाजपचे नेते इतक्या दिवस कुठे होते, आत्ताच का चौकीदारी?, दिपाली धुमाळ यांचा सवाल

pune municipal corporation's leader of opposition deepali dhumal slams on mp girish bapat and bjp for corona politics

एमपीसी न्यूज- मार्च महिन्यात कोरोनाचे संकट पुण्यात निर्माण झाले आहे. हे संकट कमी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार वारंवार बैठका घेऊन अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. पण, भाजपचे लोकप्रतिनिधी केवळ टीकाटिप्पणी, राजकारण करीत आहेत. इतक्या दिवस ते कुठे होते? खासदार गिरीश बापट यांनी मंगळवारी आयएएस अधिकाऱ्यांची भेट घेऊन आम्ही चौकीदार होणार असल्याचे सांगितले. मग इतक्या दिवस त्यांनी चौकीदारी का केली नाही ? एवढ्या उशिरा कशी जाग आली, असे अनेक सवाल महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी उपस्थित केले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक कोरोनाला रोखण्यासाठी सर्वोतोपरी कार्य करीत आहेत. प्रशासनाला सहकार्य करून ‘डॉक्टर आपल्या दारी’, असे उपक्रम राबवून औषधोपचार देत आहेत.

त्यासाठी राष्ट्रवादीच्या डॉक्टर सेलचे महत्वपूर्ण सहकार्य मिळत आहे. शिवाय ठिकठिकाणी औषध फवारणी, निर्जंतुकीकरण, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, भाजीपाला वाटप असे अनेक समाजपयोगी कार्यक्रम राबविले जात आहेत. पोलिसांना सुद्धा सहकार्य करीत आहे.

कोरोनाचे संकट मार्च महिन्यापासून पुण्यात निर्माण झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार आमचे काम सुरू आहे. अजित पवार वेळोवेळी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन उणीव काढून मार्गदर्शन करीत आहेत.

पुणे महापालिकेला सर्वेतोपरी सहकार्य करीत आहेत. मोठ्याप्रमाणात टेस्ट होत असल्याने रुग्ण पुढे येत आहेत. मास्क, सॅनिटायजर नागरिकांना पोहोचविण्यात येत आहे.

पुणेकरांना कोरोनातून मुक्त करण्यासाठी आमचे काम सुरू असताना भाजपचे नेतेमंडळी मात्र टीकाटिप्पणी, राजकारण करण्यात व्यस्त असल्याची टीकाही दीपाली धुमाळ यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.