Natyachata Spardha: असमाधानी कलाकाराकडूनच नाविन्यपूर्ण कलाकृती शक्य : ल. म. कडू

एमपीसी न्यूज: स्पर्धेच्या माध्यमातून आपण स्वत:लाच अजमावून पाहायचे असते. यश-अपयश पचवत पुढे जायचे असते. स्पर्धा असली तरी कलेच्या क्षेत्रात अंतिम ध्येयापर्यंत पोहोचलो असे होत नाही.(Natyachata Spardha) खऱ्या कलाकाराला कलेच्या क्षेत्रात समाधान नसते. जो कलाकार असमाधानी असतो तो काही ना काहीतरी नाविन्यपूर्ण कलाकृती करण्याचा प्रयत्न करत असतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक ल. म. कडू यांनी केले.
नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित 31व्या दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ निवारा वृद्धाश्रम सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी कडू बोलत होते. अभिनेता सक्षम कुलकर्णी आणि सुलभ शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष राजाभाऊ मोघे तसेच संस्थेचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांची उपस्थिती होती.
कलेचे महत्व मुलांना, त्यांच्या पालकांना समजेल तेव्हा जगणे अधिक सुंदर होईल, असेही ल. म. कडू म्हणाले. नाट्यछटा हा कलाप्रकार जीवंत ठेवण्यात नाट्यसंस्कार कला अकादमीचे मोलाचे योगदान आहे.(Natyachata Spardha) नाटक, नाट्यछटा याद्वारे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते, निरनिराळ्या आव्हानांना तोंड देणे शक्य होते, असे राजाभाऊ मोघे म्हणाले.
नाट्यसंस्कार कला अकामदी आयोजित स्पर्धांमध्ये मुलांना सहभागी करण्याची संधी दिल्याबद्दल पालकांचे अभिनंदन करून सक्षम कुलकर्णी म्हणाला, बालवयात योग्य मार्गदर्शन मिळणे खूप आवश्यक असते. अनेक पिढ्या घडविण्यात पारखी सरांचा खूप मोठा वाटा आहे.(Natyachata Spardha) संस्थेच्या उपक्रमांची माहिती देऊन प्रकाश पारखी म्हणाले, नाट्यशास्त्र हे व्यक्तिमत्व विकासाचे उत्तम साधन आहे. प्रमुख अतिथींचा सत्कार संध्या कुलकर्णी, प्रकाश पारखी यांनी तर परिचय अंजली दफ्तरदार, राधिका देशपांडे, दिप्ती असवडेकर यांनी करून दिला.
Nana kate birthday : माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा
स्पर्धेचा सविस्तर निकाल (प्रथम, द्वितीय, तृतीय या क्रमाने)
शिशुगट : इनिया दातार, अमायरा जाधव, वेधस प्रभुदेसाई. उत्तेजनार्थ – सौमिल पारुंडेकर, अंजली उकीरडे.
पहिली-दुसरी : मनस्वी देशपांडे, बिल्वा वझे, क्षिप्रा जोशी. उत्तेजनार्थ – स्पृहा कुलकर्णी, अनन्या टेकावडे.
तिसरी-चौथी : अन्वय देशमुख, देवांशी वाघ, प्रियदर्शनी पाटील. उत्तेजनार्थ – अद्विका मेहता, स्वरा सांगळे, धनिष्ठा सोनावणे.
पाचवी ते सातवी : शर्व दाते, सावनी दाते, अर्णव लहुरिकर. उत्तेजनार्थ – अक्षरा जाधव, अस्मी गोगटे, नारायणी पुराणिक.
आठवी ते दहावी : सोहा धर्माधिकारी, सई गुरव, स्वरूपा झांबरे. उत्तेजनार्थ – अनिया सिंग.
खुला गट : प्रतिक खेडेकर, ओजस्विनी पोकळे, आदित्य सरवदे. उत्तेजनार्थ – ओंकार पोकळे.