Pune News: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 100 वेळा पत्रव्यवहार ; पण ठाकरे सरकारने दखल घेतली नाही – चंद्रकांत पाटील

एमपीसी न्यूज – राज्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 100 वेळा पत्रव्यवहार केला. पण, ठाकरे सरकारने दखल घेतली नाही, असा गंभीर आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत गुरुवारी केला. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची वाटचाल ‘सत्यमेव जयते’च्या दिशेने सुरू असल्याचे सांगायलाही पाटील विसरले नाही.

कोरोना प्रकरणी राज्य सरकारला दिसत नाही, ऐकू येत नाही, या सरकारची संवेदनशीलता संपली असल्याची टीकाही त्यांनी केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेमडेसिव्हिर इंजेक्शनसाठी रुग्णांचे नातेवाईक अनेक मेडिकलमध्ये जातात. त्या ठिकाणी जादा दर आकारले जात आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर काळाबाजार सुरू आहे. त्यावर सरकारचे लक्ष नाही. यामुळे रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्या दृष्टीने राज्य सरकारने विशेष पथके नेमून काळा बाजार करणार्‍यावर धाडी घातल्या पाहिजे, असा सल्लाही पाटील यांनी यावेळी दिला. तर, पदवीधर निवडणुकीसाठी निवडून येण्याची क्षमता हीच पात्रता असल्याचे ते म्हणाले. केंद्रातून आरक्षण आणता येत नाही. हा राज्याचा विषय असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.