Pune News : कोरोनाशी लढताना मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना 50 लाखाची मदत

,पोलीस आयुक्तांच्या हस्ते धनादेश सुपूर्द

एमपीसी न्यूज : कोविड-19 मुळे निर्माण झालेल्या आप्तकालीन परिस्थीतीत पोलीस दल हे नाकाबंदी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, प्रतिबंधित क्षेत्रातील बंदोबस्त,मास्क कारवाई, लोकांमध्ये जनजागृती तसेच सोशल पोलिसींग अशा प्रकारची कर्तव्य व इतर जबाबदारी खंबीरपणे पार पाडत होते व आहेत. ही जबाबदारी पार पाडत असतानाच पुणे शहर पोलीस दलामध्ये 16 एप्रिल रोजी कोरोनाने शिरकाव केला. तेव्हापासुन आतापर्यंत पुणे पोलीस दलातील 1336 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. आठ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला तर 40 कर्मचाऱ्यांवर अजूनही उपचार सुरू आहेत. 

अशा प्रकारे कोविड-19 मध्ये पोलीस समाजाचे रक्षणासाठी झटणा-या पोलीसांची सुरक्षा व त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 50 लाख रुपये देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार पुणे शहर पोलीस दलातील दिवंगत कर्मचारी नामे सुरेश सिताराम दळवी, विनोद विश्वनाथ पोतदार आणि भगवान रामचंद्र निकम यांच्या नातेवाईकांना ही मदत पोलीस आयुक्तांच्या हस्ते देण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.