Pune News : महापालिका कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला, सातवा वेतन आयोग लागू

एमपीसी न्यूज – महापालिकेच्या प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेण्यातत आला आहे. मंत्रालयात नगरविकास मंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय आज घेण्यात आला आहे.

1 जानेवारी 2016 पासून केंद्र सरकारच्या सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला. यानंतर 2 ते अडीच वर्षाआधी राज्य शासनाच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना वेतन आयोग लागू केला आहे. याप्रमाणे, पिंपरी-चिंचवड पालिकेत सुमारे वर्षभरापूर्वी पासून वेतन आयोगाची अंमलबजावणी सुरू झालीय. परंतु, पुणे पालिकेतील वेतन आयोग लागू झाला नव्हता.

पालिकेच्या वर्ग 1 आणि वर्ग 4 मध्ये साधारण 16 हजार कर्मचारी सेवेत आहेत. त्यांचा प्रति महिना वेतन सुमारे 80 कोटी पालिका खर्च करते. तसेच, सातवा वेतन आयोगाला मान्यता मिळाल्यावर साधारण 23 % यात वाढ होणार आहे. मागील दीड वर्षांपासून येऊन ठेपलेल्या कोरोना महामारीमुळे याबाबत निर्णय घेण्यावर मर्यादा आल्या होत्या. नंतर पुणे पालिकेनं 2 महिन्याआधी याबाबत प्रस्ताव मंजूर करून राज्य शासनाकडे मान्यतेसाठी सुपूर्द केला होता त्यास मंजुरी देण्यात आली आहे.

“पुणे महापालिकेच्या जवळपास 17 हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला ही अतिशय महत्त्वाची आणि समाधानाची बाब असून यासाठी आपण महापालिकेच्या मुख्यसभेकडून हा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. सातव्या वेतन आयोगासाठी आम्ही कटिबद्ध होतो आणि त्यादृष्टीने सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे हे यश आहे. महापालिका स्तरावर विविध टप्प्यांवर आम्ही याचा पाठपुरावा करुन विषय अंतिम मान्यतेसाठी नगरविकास खात्याकडे पाठवला होता. या संदर्भात माझ्यासह विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारशी पत्रकारव्यवहार करुन सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी केली होती. त्याला अंतिम मंजुरी दिल्याबद्दल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे मनःपूर्वक धन्यवाद.
महापौर मुरलीधर मोहोळ 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.