Pune news: ‘जी-20’ बैठकीच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आली मोटारसायकल रॅली

एमपीसी न्यूज- जी-20 बैठकीच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने मोटारसायकल रॅलीचे व राष्ट्रीय युवक दिन व्याख्यानमालेचे आयोजन (Pune news) करण्यात आले.

मोटार सायकल रॅलीचा शनिवारवाडा येथून शुभारंभ करण्यात आला. या मोटारसायकल रॅलीमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 2 हजार विद्यार्थी व स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त विकास ढाकणे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. कारभारी काळे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या राज्य सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे उपस्थित होते.

Pune news: महाराष्ट्र पर्यटन महामंडळांच्या उपहारगृहांमध्ये मिळणार पौष्टिक तृणधान्याचे खाद्यपदार्थ

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे जी-20 विषयक जनजागृती करण्याकरीता राष्ट्रीय युवा दिन व्याख्यानमालेचे देखील आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, कुलगुरु डॉ. कारभारी काळे व अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त  ढाकणे यांनी जी-20परिषदेत युवकांची भूमिका, संधी व आव्हाने याबाबत युवकांना मार्गदर्शन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.