Pune News : भीमा कोरेगाव हिंसाचारात भिडेंचा सहभाग नाही – पोलिसांची माहिती

एमपीसी न्यूज – भीमा कोरेगाव प्रकरणात शिव प्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचा सहभाग नसल्याचं पुणे पोलिसांनी म्हंटले आहे. या संदर्भात यापुर्वीच भिडे यांना क्लिनचीट मिळाली होती. आता दोषारोपपत्रातूनही त्यांच नाव वगऴण्यात आलं आहे. याबाबतचं पत्र पुणे पोलिसांनी मानवी हक्क आयोगाला दिल्याची माहिती भिडेंचे वकील पुष्कर दुर्गे यांनी दिली.

 

पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्याविरोधात 2018 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.मात्र तपासादरम्यान भिडे यांचा भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात सहभां आढळला नसल्याचे पोलिसांनी कोर्टात सांगितले आहे. तसेच ही माहिती राज्य मानवी हक्क आयोगालासुध्दा पुणे ग्रामीण पोलिसांकडून देण्यात आली आहे. संभाजी भिडे यांच्याविरोधात अनिता साऴवे यांनी तक्रार दिली होती.

 

यासंदर्भात ठाण्यातील एका व्यक्तीनं पुणे पोलिस अधीक्षकांकडून माहिती मागविली होती. या माहितीला उत्तर देताना पोलिसांनी ही माहिती दिली.त्यानुसार पोलिसांनी भीमा कोरेगाव हिंसाचारात भिडेंचा सहभाग असल्याच आढळून आलेलं नसल्याच न्यायालयात सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.