Pimpri News : भोंगा प्रकरणी अटक केलेल्या मनसेच्या शहराध्यक्षासह 40 कार्यकर्त्यांची 13 तासानंतर सुटका

एमपीसी न्यूज – जिथे जिथे भोंग्यावरून बांग दिली जाते तिथे तिथे भोंग्यावरून हनुमान चालीसाचे आज पठण करावे, असे आवाहन मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्याने पोलिसांनी धरपकड केली होती. सकाळी सहा वाजल्यापासून धरपकड सुरू होती. पिंपरी-चिंचवडचे मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्यासह 35 ते 40 पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली होती. 13 तासांनंतर रात्री सात वाजता सर्वांची सुटका करण्यात आली.

भोंग्यावरुन हनुमान चालिसा लावण्याचा प्रयत्न मनसेच्या कार्यकर्त्यांकडून केला जात होता. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांकडून मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते.

अटक करण्यात आलेले कार्यकर्ते व पोलिस चौकी
सचिन तुकाराम चिखले – निगडी पोलिस स्टेशन

  • विशाल शिवाजी मानकरी
  • प्रतीक प्रकाश शिंदे
  • रोहिदास बबन शिवणेकर
  • देवेंद्र ज्ञानेश्वर निकम
  • मनोज दत्तात्रय लांडगे

सिमा बोलापुरकर – पिपरी स्टेशन पोलिस चौकी

  • अश्विनी बागर
  • अनिता पांचाळ
  • रुपेश पटेकर
  • राजु सावळे
  • सुशांत साळवी
  • दत्ता देवतरासे
  • विष्णू चावरिया
  • नितिन चव्हाण
  • आकाश लांडगे

चिंचवड पोलिस चौकी

मनविसे शहर अध्यक्ष हेमंत डांगे, चिंचवड विधान सभा अध्यक्ष मयूर चिंचवडे, उपाध्यक्ष बाळा दानवले, उपविभाग अध्यक्ष परमेश्वर चिल्लरगे ,मनविसे सचिव अक्षय नाळे, राजेश आवसरे यांना चिंचवड पोलीस यांनी ताब्यात घेतले होते.

सुशिल सोनकांबळे – भोसरी पोलिस स्टेशन

  • सुदिर जिम
  • कमलेश दर्मलिंगम
  • पुनित गावितकर
  • अशोक चौधरी

दिघी पोलिसांनी अंकुश तापकीर यांना ताब्यात घेतले होते.

वाकड पोलिस स्टेशन

  • अनिकेत प्रभु
  • तुकाराम शिंदे
  • सिध्देश सोनकवडे
  • प्रशांत वाघोले
  • विकास कदम
  • शंतनु तेलंग
  • यश कुदळे

अशा मनसेच्या 35 ते 40 सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. दिवसभर अटक करून,रात्री सात वाजता सर्वांना सोडण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.