Pune News : दळवी हॉस्पिटलमध्ये तातडीच्या प्रसूती ऑपरेशनची सुविधा द्या – ‘आप’ ची मागणी

एमपीसी न्यूज – जनवाडी,  गोखलेनगर, मॉडर्न कॉलनी  ते बोपोडी, इंदिरा वसाहत, खैरवाडी, पाटील इस्टेट या भागातील भाभा हॉस्पिटल अजून पूर्ण नाही, त्यामुळे एकमेव दळवी हॉस्पिटलमध्ये प्रसूती सुविधा आहे, परंतु तातडीची इमर्जन्सी सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे महिलेला तातडीने दुसरे हॉस्पिटल शोधावे लागते. ससूनमध्ये महिलेची आबाळ होते असा अनुभव असल्याने महिला तेथे जायला कचरतात. कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये ऍडमिशन मिळेल याची खात्री नसते. त्यामुळे खाजगी रुग्णालयात जाणे भाग पडते.
त्यामुळे या मोठया परिसरात किमान दळवी हॉस्पिटलमध्ये या तातडीच्या सुविधा सुरू करा, अशी या वस्त्यामधील महिलांची मागणी आहे.
तसेच दळवी हॉस्पिटलमध्ये बऱ्याचदा मुख्य डॉक्टर उपलब्ध नसतात. नर्सेस नसतात त्यामुळे सतत नातेवाईकांशी वादाचे प्रसंग घडतात. ‘आप’ चे शंकर थोरात यांना माहिती अधिकारांतर्गत आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार दळवी हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या सुविधा पुरवण्यासाठी सुद्धा आवश्यक असणारा स्टाफ उपलब्ध नाही. मिळालेल्या माहितीनुसार ७ डॉक्टरची गरज असताना केवळ ४ डॉक्टर आहेत तर ७ नर्सेसची गरज आहे. अजून ५ आया असणे आवश्यक आहे. बाह्य रुग्ण विभागात अटेंडन्टच नाही.  तसेच अनेक उपकरणांची मागणी प्रलंबित आहे.

या सर्व मागण्यांसाठी व महिलांसाठी आरोग्य व्यवस्था सुधारावी यासाठी आम आदमी पार्टीच्या नेतृत्वात, मुकुंद किर्दत यांच्या उपस्थितीत महिलांनी आंदोलन केले व स्मरणपत्र दिले. यावेळेस अनेक महिलांसह मुकुंद किर्दत,एशा डोंगरे, काजल दातखिळे, वैशाली डोंगरे, सतीश यादव, मंगल चौधरी, पार्वती परदेशी, पूजा चव्हाण, शंकर थोरात, अनिता श्रीराम, सरस्वती जाधव,लिलाबाई दगडे, तेजस डोंगरे, रूपा माने, झुंबर हवाले, राहुल म्हस्के, विकास चव्हाण, दिनेश चौधरी, विनोद दातखिळे, अभिमान विटकर, ईश्वर तुजारे,माधुरी रणसुरे, आकाश मुनियान, बाबा गोलंदाज, ललिता गायकवाड, संतोष पाटोळे , तुकाराम शिंदे, अभिमान विटकर,
शारुक शेख, शालन जोगदंड, आशा गायकवाड, अनुसया शिंदे, अंजना पवार, विकास लोंढे, वैशाली पवार, धर्मेंद्र डोंगरे, संदेशदिवेकर,
आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.