Pune News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भीषण अपघात; तळेगावातील युवक ठार, तर 3 जण जखमी

 एमपीसी न्यूज : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर आज सोमवारी (दि.2) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तुंगार्ली गावाच्या हद्दीत कारचा भीषण अपघात झाला. (Pune News) यामध्ये तळेगाव येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहेत.

दीपक अशोक नाटक (वय 27, रा. तळेगाव दाभाडे) असे या अपघातात मयत झालेल्या तरुणाचे नाव असून राहुल कैलास जाधव (वय 28, संत तुकारामनगर, पिंपरी), जालिंदर बापू पवार (वय 51, रा. खंडोबा माळ, पिंपरी), रोहन भगवान वाघमारे (वय 28, पिंपरी) हे तिघेजण जखमी झाले आहेत.

Aalandi News : आळंदी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा कार्यभार कैलास केंद्रे यांनी स्वीकारला

लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील सर्वजण मोटार कार क्र. MH 14 JX 9385 मधून तळेगावच्या दिशेने जात असताना तुंगार्ली गावाच्या हद्दीत समोर (Pune News) जाणार्‍या कंटेनरला सदर मोटार कारची मागून जोरात धडक बसल्याने हा भीषण अपघात झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.