Pune News – नगर रस्त्यावर अग्निशमन दलाची गाडी उलटली

एमपीसी न्यूज – नगर रस्त्यावरील चंदननगर खराडी भागात महालक्ष्मी लॅनजवळील दुकानांना लागलेली आग विझवण्यासाठी हडपसर अग्निशमन केंद्रातील देवदूत हे वाहन चालले होते. त्यावेळी चालकाचा ताबा सुटल्याने मगरपट्टा येथे हे वाहन उलटले.

सकाऴी 10 वाजून 3 मिनिटांनी हा अपघात झाला. अपघात झाला त्यावेऴी या तीन जवान कार्यरत होते.सुदैवाने यात कोणतीही जीवीत हानी झाली नाही. केवळ परशुराम जकोणे (वय 25) हे किरकोऴ जखमी झाले असून त्यांना बिबवेवाडी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर इतर जवान सुखरूप आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.