Pune News: वडगाव शेरीमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट; 10 जण जखमी

वडगाव शेरी मधील गणेश नगर गल्ली क्रमांक 9 येथे एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये घराची पडझड झाली आहे.

एमपीसी न्यूज – वडगाव शेरीमधील एका घरात आज (दि.2) सकाळी गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. या स्फोटात घराची पडझड झाली असून यामध्ये 10 जण जखमी झाल्या आहेत. जखमींमध्ये 2 पुरुष, 4 स्त्रिया व 4 मुली असे एकूण 10 जण जखमी झाले आहेत. ही घटना गणेश नगर, गल्ली क्रमांक 9 येथे घडली.

वडगाव शेरी मधील गणेश नगर गल्ली क्रमांक 9 येथे एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये घराची पडझड झाली आहे. अग्निशमन दल पोहोचण्याआधी काही जखमींना स्थानिकांनी दवाखान्यात रवाना केले. तसेच अग्निशमन दलाचे जवान पोहोचताच इतर 3 जखमींना दलाचे वाहन व रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नेले असून दलाच्या 2 फायरगाङ्या व 1 रेस्क्यू व्हॅन घटनास्थळी दाखल झाली आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.