Pune News: हडपसर गाडीतळ पुलाखाली 6 दुचाकी जळाल्या

हडपसर गाडीतळ येथे उड्डाणपुलाखाली पार्क केलेल्या दुचाकी वाहनांना बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आग लागली.

एमपीसी न्यूज – हडपसर गाडीतळ येथे उड्डाणपुलाखाली पार्क केलेल्या 6 दुचाकींना आज (दि. 2) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आग लागली. अग्निशमन विभागाने आग विझविली असून यामध्ये सर्व दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हडपसर गाडीतळ येथे उड्डाणपुलाखाली पार्क केलेल्या दुचाकी वाहनांना बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आग लागली. अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले.

यामध्ये 6 दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.