Pune News : सोने तारण कर्ज घेतले अन् तारणच ठेवले नाही, फायनान्स कंपनीला 10.20 लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज – फायनान्स कंपनीकडून सोने तारण कर्ज घेतले आणि त्यासाठी सोने तारण न ठेवता, फायनान्स कंपनीची 10.20 लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 15 ते 17 फेब्रुवारी 2022 रोजी मण्णपुरम फायनान्स लिमिटेड, चंदननगर शाखेत हा प्रकार घडला.

रुपीक फिनटेक प्रा. लि या फायनान्स कंपनीचे मॅनेजर शहाजी गायकवाड (वय 28, रा. मोरे वस्ती, मांजरी, पुणे) यांनी याबाबत चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात इसमा विरोधात भारतीय दंड विधान कलम 420, 406 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फायनान्स कंपनीत आला, त्याने 10 लाख 20 हजार 658 रूपयांचे सोने तारण कर्ज मंजूर करून घेतले. त्याबदल्यात सोने तारण न ठेवता फायनान्स कंपनीची फसवणूक केली. असे फिर्यादीत नमूद केले आहे. चंदननगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.