Pune News : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कार्यान्वित होणार ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’

एमपीसी न्यूज – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवास आता अधिक सुरक्षित होणार आहे. लवकरच द्रुतगती मार्गावर ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ (ITMS) कार्यान्वित केली जाणार असून, यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून 40 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध होणार आहे.

मुंबई-पुणे या 94 किमीच्या द्रुतगती मार्गावरून दिवसाला अंदाजे 60,000 वाहने जातात. या संपूर्ण मार्गावर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असून 39 ठिकाणी वाहनांचा वेग तपासणारी ‘अ‍ॅव्हरेज स्पीड डिटेक्शन सिस्टम’ बसविण्यात येणार आहे. तर 34 ठिकाणी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना शोधणारी अशी ‘लेन डिसिप्लेन व्हायलेशन डिटेक्शन सिस्टम’ बसविण्यात येणार आहे.

‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी 2019 मध्ये निविदा काढण्यात आली होती. मात्र दोन वर्षे झाली तरी निविदा अंतिम न झाल्याने यंत्रणा बसविण्याचे काम रखडले. आता मात्र लवकरच हा निधी दिला जाणार आहे. त्यामुळे महिन्याभरात यासाठीची निविदा अंतिम केली जाणार असल्याची माहीती समोर आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.