Pune News : पुण्यात पारा 41.3 अंशावर, उष्णतेची लाट राहणार काही दिवस कायम

एमपीसी न्यूज – गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानाचा पारा चढला आहे. राज्यातील अनेक भागात तापमान 40 अंशांच्या पुढे गेले आहे. देशातही उकाड्याने नागरीक हैराण झाले आहेत. ही उष्णतेची लाट एप्रिलमध्येही कायम होती. पुण्यात आज 41.3 अंश तापमानाची नोंद झाली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ही उष्णतेची लाट अजून काही दिवस कायम राहणार आहे.

पुण्यात यापूर्वी 7 एप्रिल, 8 एप्रिल आणि 26 एप्रिल रोजी तापमान 41.1 अंश इतके नोंदले गेले होते, अशी माहिती हवामान विभागाने दिली. यंदाचा एप्रिल हा अन्य वर्षांच्या एप्रिलपेक्षा वेगळा आहे. कारण इतर वर्षांच्या तुलनेत हा एप्रिल तेवढा कडक  नाही. कारण यापूर्वी 1987 मध्ये 43 अंश तापमानाची नोंद  झाली होती.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात आज प्रचंड उकाडा जाणवत होता. दुपारी पंखे चालू करून देखील घरात बसणे असह्य झाले होते. रस्ते तापल्यामुळे  दुचाकी चालकांना वाहने चालवणे कठीण झाले होते. संध्याकाळी सात वाजता देखील वाहने चालवताना उष्णतेच्या झळा जाणवत होत्या.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.