Pune News: देशातील टियर-२, टियर-३ शहरांकरता मेट्रो नियो अनोखा आणि किफायतशीर वाहतुकीचा प्रकल्प

एमपीसी न्यूज:  महा मेट्रो तर्फे राबवल्या जाणाऱ्या मेट्रो नियो प्रकल्पाचे दुबई येथील जागतिक एक्स्पो दरम्यान सादरीकरण करण्यात आले. एक अनोखा प्रकल्प म्हणून संपूर्ण देशात चर्चा होत असलेला मेट्रो नियोप्रकल्पाची अंमलबाजवणी नाशिक येथे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

मेट्रो नियो सोबल मल्टी मॉडल इंटिग्रेशन (एमएमआय) या पुणे व नागपुरात राबवल्या जाणाऱ्या प्रकल्पाचे सादरीकरण देखील या दरम्यान झाले. महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित यांनी हे सादरीकरण केले. महत्वाचे म्हणजे दिल्ली येथे नुकतेच आयोजित झालेल्या अर्बन मोबिलिटी इंडिया (युएएमआय) २०२१ च्या संमेलनात मल्टी मॉडल इंटिग्रेशन विषयावर पुरस्कार मिळाले होते.

वर्ल्ड एक्स्पो दुबई येथे डॉ दीक्षित यांनी मेट्रो नियो या विषयावर सादरीकरण केले. ‘स्मार्ट आणि किफायतशीर वाहतूक व्यवस्था, नागरी भागातील परिवहनाच्या साधनांवर भर या विषयावर आयोजित चर्चासत्रा दरम्यान डॉ दीक्षित बोलत होते. देशातील टियर-२ आणि टियर-३ शहराकरता मेट्रो नियो अनोखे आणि स्वस्त सार्वजनिक वाहतुकीचे साधन असल्याचे ते म्हणाले. मेट्रो नियो पर्यावरण पूरक आणि सुरक्षित वाहतुकीचे साधन असल्याचे डॉ दीक्षित म्हणाले.

मेट्रो नियो जगातील अन्य शहरांकरिता वाहतुकीचे उपयुक्त साधन असल्याचे डॉ ओ पी अग्रवाल म्हणाले.१९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले तेव्हा देशातील अनेक शहरांमढे द्राम हे सार्वजनिक वाहतुकीचे महत्वाचे साधन होते असे डॉ दीक्षित म्हणाले. मेट्रो प्रकल्प सुरु करण्याच्या दृष्टीने पहिले मोठे पाऊल तेव्हा पडले जेव्हा कोलकाता येथे मेट्रो प्रकल्पाच्या भूमिगत कामाकरता बांधकाम सुरु झाले. पण असे पर्याय छोट्या शहरांकरता व्यावहारिक ठरत नसल्याने महा मेट्रोने मेट्रो नियो संकल्पना मांडल्याचे ते म्हणाले.

३३ किलोमीटर लांब नाशिक प्रकल्पात २ उन्नत मार्ग आहेत. २०१२ मध्ये सादर झालेल्या केंद्रीय अर्थ संकल्पात या संबंधी घोषणा झाली होती. एकूण ४ वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. प्रकल्पाला लागणारा एकूण खर्च रुपये २०९२.६ कोटी इतका आहे.

मेट्रो नियो अनोखा, किफायतशीर, विश्वासार्ह्य सार्वजनिक वाहतुकीचा प्रकल्प आहे. याने प्रवास केल्यावर जागतिक दर्जाच्या वाहतूक साधनाने प्रवास केल्याचा अनुभव प्रवाश्यांना येईल. देशांतर्गत नाशिक शहरात पहिल्यांदाच हा प्रकल्प राबवला जाणार आहे. मेट्रो प्रकल्पाची संकल्पना भारतात नवीन असली तरीही दळण वळणाचे महत्वाचे साधन म्हणून आता हे देशात नावारूपाला येत आहे. पण असे असतानाही प्रकल्पाच्या संचालनादरम्यान नागरिकांना मेट्रोशी जोडणे हे सर्वात मोठे आवाहन आहे. परिवहनाच्या इतर साधनांचे आणि मेट्रोचे फिडर सेवेच्या रूपात एकात्मीकरण करून या दोन घटकांना जवळ आणता येते आणि हे काम महा मेट्रो नागपूरने व पुण्यात केल्याचे महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दीक्षित म्हणाले,

युएएमआय २०२१ (UMI 2021) दरम्यान मल्टी मॉडल इंटिग्रेशन संबंधी पुरस्कार मिळाल्याबद्दल या चर्चासत्राचे मॉडरेटर डॉ ओ पी अग्रवाल यांनी डॉ दीक्षित यांचे अभिनंदन केले. नागपूर मेट्रोने शहरात एक आदर्श फिडर सेवा निर्माण केली असून पुण्यातही लवकरच अशी सेवा कार्यान्वयीत करण्यात येणार आहे. इतर मेट्रो प्रकल्पांनी याच प्रमाणे हि सेवा राबवायला हवी, असे डॉ ओ पी अग्रवाल म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.