Bhosari Crime News : भाड्याने घेतलेल्या कार व भाडे न देता साडेनऊ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – दरमहा भाडे देण्याचे अमिष दाखवून एका व्यक्तीने तरुणाकडून साडेनऊ लाखांच्या दोन कार घेतल्या. त्या कारचे भाडे व कार तरुणाला न देता साडेनऊ लाखांची फसवणूक केली. ही घटना 6 ऑगस्ट ते 20 ऑक्टोबर 2021 या कालावधीत कासारवाडी, भोसरी येथे घडली.

विशाल गणपत खेडकर (वय 28, रा. संत तुकाराम नगर, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सागर मोहन साबळे (वय 34, रा. साबळेवाडी, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्याकडून त्यांच्या मालकीच्या दोन कार भाड्याने घेतल्या. एका कारचे दरमहा 22 हजार रुपये तर दुस-या कारचे दरमहा 27 हजार रुपये भाडे देण्याबाबत आरोपीने फिर्यादी यांच्यासोबत नोटरी केली. दोन्ही कार स्वतःच्या ताब्यात घेऊन फिर्यादी यांना कारचे भाडे न देता तसेच त्यांच्या कार परत न करता त्यांची विल्हेवाट लावून फिर्यादी यांची साडेनऊ लाखांची फसवणूक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.