Pune News: विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या आश्वासनानंतर खासदार बापट यांचे आंदोलन मागे

Pune News: MP Girish Bapat's agitation back after assurance of Divisional Commissioner Saurabh Rao दिलेल्या मुदतीत या जम्बो हॉस्पिटलची उभारणी न झाल्याने बुधवारी बापट यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर भेट दिली.

एमपीसी न्यूज – सीओईपी येथे जम्बो कोविड सेंटरचे काम पूर्ण न झाल्याबद्दल खासदार गिरीश बापट यांनी बुधवारी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा तातडीने सतर्क झाली. पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बापट यांना 24 ऑगस्टपासून हे हॉस्पिटल सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर बापट यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

यावेळी पीएमआरडीएचे सुहास दिवसे उपस्थित होते. दिलेल्या मुदतीत या जम्बो हॉस्पिटलची उभारणी न झाल्याने बुधवारी बापट यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या मैदानावर भेट दिली. त्या ठिकाणी पावसामुळे मोठ्या प्रमाणात चिखल साचला असल्याचे चित्र दिसून आले.

यावेळी बापट यांच्या सोबत आमदार मुक्ता टिळक, भीमराव तपकिर, पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी 19 ऑगस्टला या जम्बो हॉस्पिटलची उभारणी करण्याचे आश्वासन दिले होते.

मात्र, ते काही पूर्ण झाले नाही. त्यामुळे बापट यांनी नाराजी व्यक्त केली. जम्बो हॉस्पिटल सुरू झाले की नाही, याची पाहणी करण्यासाठी आलो आहे. मागील काही दिवसांपासून पाऊस असल्याने अडचणी येत आहेत. आमची सहकार्याची भूमिका आहे. पुणेकरांच्या सोयीसाठी तातडीने हे हॉस्पिटल सुरू करण्यात यावे, अशी मागणी गिरीश बापट यांनी पत्रकारांशी बोलताना केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.