Pune News : पुणे गारठले ! पुण्यात मंगळवारी 8.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

एमपीसी न्यूज – पाकिस्तानातून आलेल्या धुळीच्या वादळामुळे राज्यात थंडीची लाट आली आहे. पुण्याचा पारा अतिशय खाली आला असून मंगळवारी (दि. 25) सकाळी पुण्यात 8.5 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

पाकिस्तनातून निघालेले धुळीचे वादळ गुजरात, अरबी समुद्रमार्गे महाराष्ट्रात आले आहे. महाराष्ट्रातील विविध भागातील दृष्यमानता यामुळे कमी झाली. शनिवारी आलेले हे वादळ अजूनही काही प्रमाणात आहे. धुक्यामध्ये धुळीचे कण असलेले हे वादळ अजूनही राज्यात आहे. पुण्यात देखील हे वादळ अद्याप दिसत आहे.

दरम्यान, या वादळामुळे थंडीची लाट आली आहे. हवामान विभागाने राज्यात पुढील काही दिवस थंडी वाढणार असल्याची माहिती दिली होती. पुण्याचा सरासरी पारा खाली आला आहे. माळीण सारख्या भागात मंगळवारी सकाळी 7.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

हवामानाच्या या लहरीपणामुळे शेतीवर याचा दुष्परिणाम होत आहे. अनेक पिकांवर रोग पडण्याची शक्यता आहे. तसेच ज्या नागरिकांना श्वसनाचे विकार आहेत, त्यांच्यासाठी सध्याचे वातावरण फार चांगले नाही. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क घालूनच बाहेर पडावे, असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

पुणे परिसरातील मंगळवारी सकाळचे किमान तापमान –
वडगावशेरी – 15.1
मगरपट्टा – 14.5
चिंचवड – 13.4
लवळे – 12.3
आंबेगाव – 11.1
ढमढेरे – 10.8
खेड – 10.6
पुरंदर – 10.4
दौंड – 10.4
इंदापूर – 10.4
गिरीवन – 10.2
शिरूर – 9.9
जुन्नर – 9.2
बल्लाळवाडी – 8.9
राजगुरूनगर – 8.8
शिवाजीनगर – 8.5
हवेली – 8.3
एनडीए – 8.2
पाषाण – 8.0
तळेगाव – 7.9
निमगिरी – 7.7
माळीण – 7.1

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.