Pune News : आयुक्त विकास कामाच्या आड येत असल्याचा आरोप करत स्थायी समितीची बैठक तहकूब

एमपीसी न्यूज : नगरसेवकांच्या ‘स’ यादीतील कामे शंभर टक्के करा, असे आदेश तीन वेळा प्रशासनाला दिले प्रशासन ऐकत नसल्याने सत्ताधारी भाजपची कोंडी होत आहे. त्यामुळे आज आयुक्त विकास कामाच्या आड येत असल्याचा आरोप स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला. त्यास विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पाठिंबा देत बैठक आयुक्तांचा निषेध करून स्थायी समितीची बैठक तहकूब करण्यात आली. यावेळी बैठकीत अध्यक्ष हेमंत रासने व आयुक्त विक्रम कुमार यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला होता.

कोरोनामुळे विकास कामाची आवश्‍यकता पाहून आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील वित्तीय समितीची मान्यता दिली जात आहे. त्यानंतरच प्रस्ताव स्थायी समितीपुढे येत आहेत. अंदाजपत्रकात नगरसेवकांच्या ‘स’ यादीत सुमारे ११०० कोटीची कामे असली तरी कोरोनामुळे त्यातील 30 टक्केच कामे केली जात होती. पण आता उत्पन्न वाढल्याने शंभर टक्के कामे करण्याचा निर्णय तीन वेळा घेतला गेला व वित्तीय समिती बरखास्त झाल्याचे सांगण्यात आले. तरीही आयुक्तांकडून वित्तीय समितीच्या मान्यतेची अट कायम ठेवल्याने नगरसेवकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्याचे पडसाद आज (मंगळवारी) स्थायी समितीमध्ये उमटले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.