Pune News : पुण्यात लॉकडाऊनमध्ये काय सुरु काय बंद, पालिका आयुक्तांनी काढलेत नवे आदेश

एमपीसी न्यूज – राज्य शासनाने पुढील 15 दिवस ब्रेक द चेन अंतर्गत कलम 144 लागू केलं आहे. त्यानुसार राज्यात संचारबंदीचे आदेश लागू असणार आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी याबाबतचे नव्याने आदेश काढला आहे.

_MPC_DIR_MPU_II

हे राहणार सुरु…
सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद होणार नाही. अत्यावश्यक सेवांसाठी वाहतुकीचा वापर सुरू राहणार असून, वैद्यकीय सेवा, वाहतूक सप्लाय चेन, लस उत्पादक आणि वाहतूक करणारे, मास्क, जंतूनाशक उत्पादक आणि वितरक, वैद्यकीय कच्चा माल निर्मिती करणारे कर्मचारी, जनावरांचे दवाखान्यातील कर्मचारी, शितगृहे, वेअर हाऊसिंग, बस, ऑटो, विविध देशांची राजनैतिक कार्यालये, पावसाळी कामे सुरु राहतील, सर्व बँका, सेबी, सेबीने मान्यता दिलेली कार्यालये, दूरसंचार सेवा, ई-कॉमर्स, अधिस्विकृतीधारक पत्रकार, पेट्रोल पंप सुरु राहतील, शासकीय आणि खासगी सुरक्षा मंडळे, आयटी सेवा सुरू राहणार आहेत. तसेच हॉटेल्स रेस्टॉरंट्सवर पूर्वीप्रमाणेच निर्बंध कायम असून, टेक अवे, होम डिलिव्हरी सेवा सुरू राहतील. रस्त्यावरील खाद्य विक्रेत्यांनाही परवानगी देण्यात आली असून, त्यांनीही पार्सल व्यवस्थाच, रुग्णालये डायग्नोस्टिक सेंटर, क्लिनिक, वैद्यकीय, विमा कार्यालय, फार्मसी फार्मासिटिकल कंपनी आणि इतर वैद्यकीय तसेच आरोग्य सेवा, किराणा दुकाने, भाजीपाला डेअरी बेकरी मिठाई आणि खाद्यपदार्थांचे दुकाने, उत्पादन क्षेत्रात ऑक्सिजन प्रोड्युसर कंपन्या, बांधकाम कर्मचाऱ्यांची निवासी सोय, डे केअर.

हे बंद राहणार :
सर्व उद्याने, मैदाने, सर्व प्रकारची दुकाने, मार्केट आणि मॉल, सर्व खासगी कार्यालये, सिनेमागृह, नाट्यगृह, जिम क्लब, स्विमिंग पूल आणि क्रीडा संकुल, हॉटेल, रेस्टॉरंट बार, फूड कोर्ट हे बंद राहणार, सर्व धार्मिक स्थळे, ब्युटी पार्लर, सलून, स्पा, केशकर्तनालय, प्राथमिक माध्यमिक शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.