Pune News: पुणेकरांची धाकधूक वाढली , दक्षिण आफ्रिकेतून आलेला तरूण कोरोना पॉझिटिव्ह 

एमपीसी न्यूज: पुणे शहरामध्ये दक्षिण आफ्रिके मधून आलेल्या व्यक्ती कोरोना पोसिटीव्ह आढळून आली आहे.ओमीक्रोन कोरोना विषाणूंचा धोका लक्षात घेता. महापालिका प्रशासन सतर्क झाले असून तरुणाला कोविड सेंटरमध्ये दाखल केले आहे. मात्र या व्यक्तीला कोरोनाच्या नव्या व्हेरियंट ओमीक्रॉनची लागण झाली आहे का या बाबतचा अहवाल येणे बाकी आहे.

महापालिका अधिकाऱ्याने दिलेल्या माहिती नुसार दक्षिण अफ्रिकेतून पुण्यामध्ये एक प्रवाशी दाखल झाला असून तो कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्याच्या कुटुंबातील चौघेजण हे परदेशात फिरायला गेले होते आणि त्यापैकी एका व्यक्तीचा कोविड पॉझिटिव्ह आहेत. 
एकाचा कोविड पॉझिटिव्ह आढल्याने इतर तिघांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर लक्षण आढळून आलेल्या तरुणाला कोविड सेंटरमध्ये दाखल कऱण्यात आले आहे. तसंच खबरदारी म्हणून तातडीने या प्रवाशाची ओमिक्रॉनची चाचणी केली जाणार आहे, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.