Pune : पेठे ज्वेलर्समधील दरोड्यामध्ये जळगाव पोलीस दलामधील बडतर्फ पोलिसाचा हात (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज- कोथरूड मधील पेठे ज्वेलर्सवर दरोडा टाकून बंदुकीच्या धाकाने सुमारे 10 लाख रुपयांचे दागिने चोरून नेणाऱ्या घटनेमध्ये जळगाव पोलीस दलामधून बडतर्फ केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

कोथरूड मधील पेठे ज्वेलर्समध्ये 24 नोव्हेंबर रोजी दोघांनी प्रवेश करून भरदिवसा बंदुकीचा धाक दाखवून 10 लाख 19 हजार 600 रुपयांचे सोन्याचे दागिने लुटून नेले होते. दोन चोरट्यांपैकी बंदुकीतून गोळीबार करणारा चोरटा हा जळगाव पोलीस दलामधून बडतर्फ केलेला कर्मचारी असल्याचे पोलीस तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. त्याचप्रमाणे गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली दुचाकी जळगाव मधून चोरली असल्याचे तपासात पुढे आले आहे. या दुचाकीमुळे चोरटे जळगाव मधील असावेत असा संशय पुणे पोलिसांना आला. दुचाकीची माहिती काढली असता या गाडीची नोंदणी आरटीओ कडे झालेली नसून प्रत्येक शोरुमध्ये जाऊन पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असून दोन्ही दरोडेखोरांचे चेहेरे स्पष्ट दिसत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.