Pune: कोरोना आटोक्यात आणण्यासाठी भिलवाडा, बारामती पॅटर्न राबवा- चंद्रकांत पाटील 

महापालिका आयुक्तांची घेतली भेट

एमपीसी न्यूज – पुण्यात कोरोनाचे दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने बुधवारी भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रकांत पाटील यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. पुण्यात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. ते आटोक्यात आणण्यासाठी राजस्थानमधील भिलवाडा किंवा महाराष्ट्रातील बारामती पॅटर्न राबविण्याची मागणी पाटील यांनी आयुक्तांकडे केली.

यावेळी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुणे शहरात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. वारंवार सांगूनही काही अतिउत्साही नागरिक रस्त्यावर येत आहेत. अशी माणसे वर्दीला घाबरतात. त्यासाठी होमगार्ड, एसआरपीची मदत घ्यावी. प्रसंगी प्रायव्हेट सिक्युरिटी घ्यावी, त्यासाठी  पैशाची अडचण येणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, पुणे शहरातील दाटीवाटीने राहत असलेल्या भागांत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढतच आहेत. भवानी पेठेत तब्बल 168 रुग्ण आहेत. कसबा – विश्रामबागवाडा 102, ढोले पाटील रोड परिसरात 97 रुग्ण आहेत. कोंढवा, हडपसर, येरवडा, सहकारनगर, शिवजीनागर – घोलेरोड परिसरात कोरोनाचे रुग्ण वाढतेच आहेत. 700 च्या आसपास हा आकडा गेला आहे. तर, 50 च्या वर नागरिकांचा पुण्यात कोरोनामुळे बळी गेला आहे. पुण्यात हे संकट गंभीर होत असल्याने केंद्रीय पथकानेही आढावा घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.