Pune : ड्यूटी मिळाली नाही म्हणून पीएमपीएमएल कामगाराचा आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज : ड्यूटी मिळाली नाही (Pune) म्हणून एका पीएमपीएमएल कामगाराने झाडावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. कामगार हंगामी असून पोलिस प्रशासन आणि अग्निशमन दलामुळे या कामगाराचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. ही घटना आज दुपारी पीएमपीएमएल आगारात घडली आहे. 

या कामागराचे नाव चौरे असून तो पीएमपीएमएलमध्ये हंगामी कामगार आहे. त्याला काम न मिळाल्यामुळे त्याने झाडावर चढून जीव देण्याचा प्रयत्न केला होता. सहकाऱ्यांनी विनंती करूनही त्यांचे त्याने ऐकले नाही. अखेर पोलिस पोलिस प्रशासन आणि अग्निशमन दलाला बोलवावे लागले. त्यानंतर त्याची समजूत काढल्यानंतर तो झाडावरून उतरला.

Chikhali : नटसम्राट’ कोण हे जनता जाणते – देवेंद्र फडणवीस

पीएमपीएमएलमध्ये 1500 कामगारांची हंगामी (Pune) कामगार म्हणून निवड झाली आहे. परंतु, जर काम मिळाले तरच पैसे मिळतील आणि घर चालेल. त्यामुळे कामगार सातत्याने हंगामी कामगारांना कायम करण्याची मागणी करत आहेत. काम मिळत नसल्याने या कामगारांचे हाल होत असल्याचे समोर आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.