Today’s Horoscope 10 March 2024– जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज –  Today’s Horoscope 10 March 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – रविवार.

तारीख – 10.03.2024.

शुभाशुभ विचार – अमावस्या वर्ज्य.

आज विशेष – दर्श अमावास्या.

राहू काळ – सायंकाळी 4.30  ते  6.00.

दिशा शूल – पश्चिमेस असेल.

आज नक्षत्र – पूर्वा भाद्रपदा.

चंद्र राशी – कुंभ 20.40 पर्यंत नंतर मीन.

—————————–

मेष – ( शुभ रंग – राखाडी)

आज तुम्ही अगदी सहजच घेतलेले निर्णयही योग्य ठरतील. मित्र दिलेली आश्वासने पाळतील. महत्त्वाची आर्थिक व्यवहार दिवसाच्या पूर्वार्धातच उरकणे गरजेचे आहे.

वृषभ – ( शुभ रंग- चंदेरी)

उच्चशिक्षित मंडळींना मनासारख्या नोकऱ्यांचे प्रस्ताव येतील. निर्णय घ्यायला मात्र वेळ लावू नका. आज मित्र तुम्हाला दिलेला शब्द पळतील. छान दिवस आहे.

मिथुन – ( शुभ रंग- सोनेरी)

ऑफिसमध्ये अधिकारी वर्गाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. अविश्रांत मेहनतीच्या जोरावर आज तुम्ही ध्येयाकडे वेगाने वाटचाल कराल. कायद्याची चौकट मात्र मोडू नका.

कर्क – (शुभ रंग – पिस्ता)

कार्यक्षेत्रात घडलेल्या काही मनाविरुद्ध घटनांनी नैराश्य येईल. आज वरिष्ठांशी नमते घ्या व सहकारी वर्गाशी जुळवून घ्या. वाहन चालवताना ओव्हरटेक करू नका.

सिंह -( शुभ रंग – क्रीम )

आज आपल्या मर्यादित राहिलेले बरे. अति आक्रमकतेने नुकसान होईल. संध्याकाळी वाहन चालवताना जरा जपून. मुलांनी कुसंगती पासून लांबच राहावे. पालक हिताचेच सांगत आहेत.

कन्या – ( शुभ रंग- आकाशी)

कार्यक्षेत्रात काही आव्हान देणारे पेच प्रसंग सोडवावे लागतील. वैवाहिक जीवनात सौम्य मतभेद राहतीलच. भागीदारीत आर्थिक व्यवहार लिखित स्वरूपात करावेत.

तूळ – ( शुभ रंग- डाळिंबी)

महत्त्वाची कामे आज दिवसाच्या पूर्वार्धातच उरकून घ्या. आज मुलांची शैक्षणिक प्रगती पाहून तुम्ही आनंदीत व्हाल. रुग्णांना असाध्या आजारावर योग्य डॉक्टर भेटतील.

वृश्चिक-  ( शुभरंग – निळा)

हाती असलेला पैसा जपून वापरा. भावनेच्या भरात कोणालाही वचने देऊ नका. मुलांचे ही अति लाड नकोत. आज तुम्हाला तुमची खोटी स्तुती करणारे मित्र भेटतील.

धनु-  (शुभ रंग- पांढरा)

नोकरीच्या ठिकाणी अथक परिश्रमांचे फळ मिळेल. सामाजिक कार्यकर्त्यांना लोकप्रियता मिळेल. कुटुंबियांना अभिमानास्पद वाटेल अशी एखादी कामगिरी आज तुमच्या हातून होईल.

मकर – (शुभ रंग- गुलाबी)

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असल्याने तुम्हाला प्रत्येक कामात चांगला उत्साह राहील. आज लहान भावास कदाचित तुमच्या मदतीची गरज भासेल.

कुंभ – (शुभ रंग- मोतिया)

आज तुम्ही हट्टीपणाने वागाल. सडेतोड बोलण्याने आपलीच माणसे दुखावली जाण्याची शक्यता आहे. आर्थिक आवक चांगली असली तरीही पैशाची उधळपट्टी नको.

मीन – ( शुभ रंग- मरून)

विविध मार्गाने येणारा पैसा विविध मार्गाने जाईल. दूरच्या प्रवासात आपल्या किमती वस्तू सांभाळा. आज विदेशाशी संबंधित असलेले व्यवसाय उत्तम चालतील.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन 9689165424

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.