Pune : बारामती येथे उभारणार पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मौजे गोजुबावी येथे पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार (Pune) आहे. बुधवारी (दि. 8) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या कामासाठी मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

सध्या पुणे येथे श्वान प्रशिक्षण केंद्र असून त्याचे बांधकाम मोडकळीस आलेले आहे. तसेच या ठिकाणी प्रशिक्षणासाठी सुविधा नाही. सध्या श्वान पथकात 102 गुन्हे शोधक, 74 बॉम्ब शोधक, 45 अंमली पदार्थ शोधक, 5 गार्ड ड्युटी, 4 पेट्रोलिंग आणि बीडीडीएस पथकातील 120 असे 350 श्वान आहेत.

Pune : आपल्या विद्यापीठांना सावित्रीबाईंचे नाव आहे पण त्यांचा एकही विचार किंवा पाठ शिकवला जात नाही- बाबा आढाव

पुणे येथे केवळ 20 श्वान व हस्तकांना प्रशिक्षण देण्यात येते. नवीन प्रस्तावित श्वान प्रशिक्षण केंद्रात एकाच वेळी 50 श्वानांना प्रशिक्षण देण्याची सुविधा आहे. हे केंद्र सुमारे 7 हेक्टर जागेवर उभारण्यात येणार असून भविष्यात वन विभाग, उत्पादन शुल्क, कारागृह, एसडीआरएफ अशा संस्था देखील त्यांच्या श्वानांना या ठिकाणी प्रशिक्षण देऊ शकतील.

या ठिकाणी श्वान ब्रिडींग सेंटर सुरु होऊ शकते. या प्रशिक्षण केंद्राकरिता एक पशुवैद्यकीय अधिकारी आणि एक पशु वैद्यकीय अधिकारी मदतनीस अशी 2 पदे देखील निर्माण करण्यात येणार आहेत. या केंद्रासाठी 56 कोटी 76 लाख 16 हजार 440 एवढ्या खर्चास देखील मान्यता देण्यात आली (Pune) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.