Pune news : पुणे रेल्वे विभागातील राजभाषा पंधरवडा निमित्त पारितोषिक वितरण

एमपीसी न्यूज : पुणे रेल्वे विभागात 15 सप्टेंबरपासून सुरू झालेला राजभाषा पंधरवडा 30 सप्टेंबरला संपला. समारोप समारंभाच्या निमित्ताने विविध स्पर्धेतील विजेत्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.(Pune news) या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय रेल्वे व्यवस्थापक  रेणू शर्मा होत्या. पंधरवड्यादरम्यान निबंध, भाषण आणि नोटिंग मसुदा, हिंदी सामान्य ज्ञान प्रश्न मंजुषा आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.

बक्षीस वितरणादरम्यान एक काव्य परिसंवादही आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये विभागीय रेल्वे व्यवस्थापक रेणू शर्मा यांच्यासह सुधांशू मित्तल, शीतल वाली, सुरेशचंद्र जैन, राजेश टागोर, प्रशांत मिश्रा आणि विनिश सक्सेना, रविकांत कालीचरण, प्रीती शेवडे, शेवडे आदी उपस्थित होते.(Pune news) तुषार वर्मा, रत्नप्रभा प्रभुणे, शुभांगी सावंत, कुंदन नेगी आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध अभिरुचींनी भरलेल्या प्रेरणादायी रचना सादर केल्या, ज्याचे संचालन कार्यकारी अभियंता राजेश टागोर यांनी केले.

Bibwewadi Police : माजी आमदारास खंडणी मागणाऱ्या सराईत गुन्हेगाराला तेलंगणामधून अटक

रेणू शर्मा यांनी विभागातील हिंदीच्या प्रगतीबद्दल आनंद व्यक्त करून राजभाषा हिंदीचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत, असे सांगितले.(Pune news) अतिरिक्त मुख्य राजभाषा अधिकारी आणि अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेशकुमार सिंह यांनी कामात हिंदीचा अधिक वापर करण्यावर भर दिला. राजभाषा अधिकारी डॉ. शंकरसिंह परिहार यांनी संचालन केलेल्या हिंदी विभागाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.