Pune Rain : पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये पावसाची अचानक हजेरी; ऐन दिवाळीत लोकांची गैरसोय

एमपीसी न्यूज : ऐन दिवाळीच्या सुरुवातीलाच (Pune Rain ) मुंबई पाठोपाठ पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. जोरदार वाऱ्यासह पावसाने पुण्यात हजेरी लावली. त्यामुळे लोकांची तारांबळ उडाली.  

बिबवेवाडीत 82 मिमी इतका पाऊस झाला असून पुण्यात पेठ भाग, पाषाण, बाणेर, औंध, हिंजवडी, वाकड, (Pune Rain ) बावधन, डेक्कन, खडकी येथे जोरदार पाऊस झाला.  हा पाऊस 8 ते 8.30 मध्ये थांबण्याची शक्यता असून उद्या पाऊस पडणार नसल्याचे हवामान अभ्यासक विनीत कुमार यांनी ट्विटच्या माध्यमातून संगितले आहे.


मुसळधार पाऊसामुळे बालाजी नगर, राम मंदिराजवळ सदगुरू सोसायटीची (नाल्यालगत) सीमाभिंत पडल्याने चारचाकी वाहनाचे नुकसान झाले असून यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले आहेत.

Chinchwad : वंचित घटकांसाठी सर्वानीच पुढाकार घेणे गरजेचे – चंद्रकांत पाटील

आज धनत्रयोदशी निमित्ताने विविध कार्यलयामध्ये पूजा आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तर रस्त्यावर खरेदीसाठी लोकांची गर्दी असतानाच पावसाने हजेरी लावली. यामुळे मात्र लोकांची गैरसोय झाली. अनेक ठिकाणी लाइट गेल्याने लोकांना त्रास सहन करावा लागला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.