Pune : शहरात रिमझिम पाऊस; जिल्ह्यातही समाधानकारक पाऊस

एमपीसी न्यूज – राज्यात हजेरी लावणाऱ्या मान्सूनने पुण्याकडेही मार्गक्रमण करत हजेरी लावली. जिल्ह्यासह शहरातही गेल्या काही दिवसांपासून मान्सूनच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्याची प्रतीक्षा आज (सोमवारी) संपली. पुण्यामध्ये आज पावसाने रिमझिमपणे हजेरी लावली.

मान्सून 20 ते 22 तारखेला अर्थात दोन दिवसात सक्रीय होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. त्याप्रमाणे आज पुण्यात सायंकाळी 6.00 च्या सुमारास जोरदार पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच ताराबंळ उडालेली पहायला मिळाली.

  • सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली असून, जिल्ह्यातील अनेक भागात समाधानकार पाऊस झाला आहे.अचानक झालेल्या या पावसामुळे प्रवाशांची आणि दुचाकीस्वारांची धांदल उडाली. या पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.