Pune : सर्वसाधारण सभेवरुन सत्ताधारी – विरोधकांत शाब्दिक चकमक

जीबी चालवा', असे म्हणत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी सुमारे अर्धा तास आक्रमक भूमिका घेतली. : Ruling party in general meeting - verbal clash between the opposition

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ‘आम्हाला बोलू द्या, शहरातील नागरिक व्हेंटिलेटरवर आहेत, त्यांना ऑक्सिजन बेड मिळत नाही, प्रशासन काम करीत नाही. जीबी चालवा’, असे म्हणत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी सुमारे अर्धा तास आक्रमक भूमिका घेतली. तर, सर्वसाधारण सभा न चालविण्याचे राज्य शासनाचे आदेश आहेत. त्यासाठी शासनाची परवानगी आणा, अशा शब्दांत भाजपच्या नगरसेवकांनी सुनावले. यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आज, गुरुवारी महापालिका सभागृहात जोरदार शाब्दिक चकमक उडाली.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही विरोधी पक्षांचे कान टोचले. आपण, सर्व जेष्ठ मंडळी आहात, कोरोनाच्या संकट काळात जीबी चालविणे बरोबर नाही. जोपर्यंत शासनाचे आदेश येत नाहीत, तोपर्यंत जीबी चालविणार नाही, असे महापौर मोहोळ यांनी सांगितले.

सभागृहात बेकायदेशीर कामकाज होणार नाही. अशा प्रकारे कामकाज करा म्हणणे तुमचेही बरोबर नाही. शासनाचे स्पष्ट आदेश आहेत, राज्य शासनाने चुकीचे निर्णय घेतले, असे तुम्हाला म्हणायचे आहे का, असा सवालही महापौरांनी उपस्थित केला.

राज्यात इतरही मनपा, नगर परिषदा व स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, त्यांच्याही सभा होत नाहीत, असेही महापौरांनी स्पष्ट केले.

तर, 5 महिने झाले आम्ही तुमचेच ऐकतोय, आता आमची आणि पुणेकरांचीही ऐकण्याची मानसिक संपली, असे मनसेचे गटनेते वसंत मोरे म्हणाले. आपण एक हजार मृत्यू लपवल्याचा आरोप केला, तो अतिशय गंभीर आहे. ते खरे असेल तर आयुक्तांवर गुन्हा दाखल करावा लागेल, असा इशारा राष्ट्रवादीचे नगरसेवक विशाल तांबे यांनी दिला.

पुणे महापालिकेतर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 300 कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, त्याची काहीही माहिती मिळत नाही. याबाबत महापौरांनी नव्हे तर प्रशासनाने उत्तर द्यावे, असे आवाहन विरोधी पक्षनेत्या दीपाली प्रदीप धुमाळ यांनी केले.

आपल्याला कोरोवर मात करायची आहे. या गंभीर परिस्थितीत कोरोना रुग्णांना व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेड मिळत नाही. रात्री अपरात्री कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांचे नगरसेवकांना फोन येतात. मुंबईत कोरोना आटोक्यात येतो पण पुण्यात का येत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.