Pune : धक्कादायक! सदाशिव पेठेतील ‘होलसेल’ मेडिकल दुकानातील 38 कामगारांना कोरोनाची लागण 

Pune: Shocking! 38 workers of 'wholesale' medical shop in Sadashiv Peth detected corona infected

एमपीसी न्यूज – पुण्यातील सदाशिव पेठेत औषधांच्या घाऊक दुकानातील 38 कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी (दि.16) समोर आला आहे. कोरोनाबाधित असलेले 38 रुग्ण हे शहरातील छोट्या-मोठ्या मेडिकलच्या दुकानांत औषधांची डिलिव्हिरी करण्याचे काम करत होते. 

एकाच दुकानातील 38 जण आणि अन्य एका दुकानातील पाच जणांना करोनाचा संसर्ग झाल्याची माहिती केमिस्ट असोसिएशनचे सचिव अनिल बेलकर यांनी दिली आहे. शहरात औषधे पोहचवणाऱ्या कर्मचाऱ्यांना करोना झाल्यामुळे नवीन नियमावली तयार करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, राज्यातील करोनाच्या हॉटस्पॉटपैकी एक असणाऱ्या पुण्यातील परिस्थिती अद्यापही चिंताजनक आहे. पुणे शहरात शनिवारी दिवसभरात 202 करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये एका 46 वर्षीय तृतीयपंथीयाचा समावेश आहे. यासोबत करोनाबाधित रुग्णांची संख्या 3295 झाली आहे. तर मृतांची संख्या 185 झाली आहे. दरम्यान 68 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत पुण्यात 1698 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

मेडिकल दुकानांना औषधे पुरवणाऱ्या कमागारांनाच कोरोनाची लागण झाल्यामुळे शहरात भीती आणि चिंतेचे वातावरण आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.